अक्कलकोट, दि.6 जुलै : प्रकल्प संचालक संजय कदम यांच्या सचोटी-चिकाटी या कार्य पध्दतीमुळे अक्कलकोट ते सोलापूर या महत्त्वकांक्षी रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे सांगून नोव्हेंबर 2021 मध्ये लोकार्पण होईल असे प्रतिपादन खासदार डॉ.शिवाचार्यरत्न जयसिध्देश्वर महास्वामीजी यांनी केले.
राष्ट्रीय महामार्ग मंत्रालय अंतर्गत भारतमाता प्रयोजनातून साकारत असलेल्या अक्कलकोट ते सोलापूर या रस्त्यावर श्रीक्षेत्र अक्कलकोटनजीक सदरच्या दुतर्फा वृक्षारोपण शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी खा.डॉ.जयसिध्देश्वर महास्वामीजी हे बालत होते.
या कार्यक्रमास तहसिलदार अंजली मरोड, प्रकल्प संचालक संजय कदम, शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख, भाजपा शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, न.प.पक्षनेता महेश हिंडोळे, टिम लीडर साहुजी पाटील, प्रोजेक्ट व्यवस्थापक पवनकुमार श्रीवास्तव, रमेश कापसे, अंकुश चौगुले, आतिष पवार, राहुल गाडे, खंडप्पा वग्गे आदीजण उपस्थित होते.
खा.डॉ.महास्वामीजी बोलताना म्हणाले, पर्यावरण संरक्षणात योगदान देणे गरजेचे आहे. यामुळेच देश महान बनणार असल्याचे सांगून महास्वामीजी यांनी सोलापूर ते हैदराबाद रस्ता कधी पूर्ण होणार माहिती नाही, मात्र अक्कलकोट ते सोलापूर या रस्त्याचे काम 90 टक्के पुर्ण झालेले आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये सदरचा रस्ता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याचे महास्वामीजी यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख यांनी अक्कलकोट ते सोलापूर या रस्त्याच्या कामाचे कौतुक करुन प्रकल्प संचालक संजय कमद यांनी नेहमीच या रस्त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने आज सदरचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचलन राष्ट्रीय महामार्गाचे जनसंपर्क अधिकारी अनिल विपत यांनी केले. तर आभार प्रशांत कुलकर्णी यांनी मानले.
Leave a Reply