Big9news Network
आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सीईओ स्वामी यांनी सामान्य प्रशासन विभागाचा आढावा घेतला. सामान्य प्रशासन विभाग हा थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिनस्त असलेला विभाग, या विभागाचे नियंत्रण उर्वरित सर्व विभागावर असते. आतापर्यंत माझ्या चार महिन्याच्या या कालावधीत सामान्य प्रशासन विभागाचे काम इतर विभाग आपेक्षा अधिक चांगले असल्याचे माझ्या लक्षात आले आहे. आपल्या विभागाची प्रलंबित प्रकरणे कमी असून उर्वरित प्रलंबित काम आपण लवकरच पूर्ण कराल अशी माझी खात्री आहे. त्याचप्रमाणे कामकाजात जे विभाग मागे आहेत त्यांचेवर सनियंत्रण ठेवून आपण इतर विभागाकडून काम करून घ्यावे अशी माझी अपेक्षा आहे. प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून काम केले तर कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत. आपल्यामध्ये चांगली बौद्धिक व शारीरिक क्षमता आहे त्या क्षमतेचा योग्य वापर करून आपण या जिल्हा परिषदेचा नावलौकिक निश्चितच वाढवाल ही माझी खात्री आहे. असे गौरवोद्गार सीईओ स्वामी यांनी प्रशासन विभागाबद्दल काढले. नजीकच्या काळात सामान्य प्रशासन विभागाने इतर कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी गरजांवर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावा ज्यामध्ये फाईल सिस्टिम, गतिमान कामकाज, दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा योग्य वापर आदी बाबींचा समावेश असेल. अशी अपेक्षा स्वामी यांनी व्यक्त केली.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, सहाय्यक प्रशासन अधिकारी अनिल जगताप, कनिष्ठ प्रशासनाधिकारी रुपनर व सामान्य प्रशासन विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आपली जबाबदारी आणखीनच वाढलेली आहे त्यामुळे नजीकच्या काळात आपणास दुप्पट क्षमतेने काम करावे लागेल. सोलापूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नती वेळेत पूर्ण करून राज्यात क्रमांक एक चे काम केले आहे. येथून पुढेही आमचा आदर्शवत काम करण्याचा प्रयत्न असेल. असे यावेळी बोलताना परमेश्वर राऊत म्हणाले.
Leave a Reply