Big9News Network
राज्य निवडणूक आयोगाच्या 10 मे 2022 रोजी च्या प्रभाग रचना कार्यक्रमानुसार 2 जुन 2022 रोजी सोलापूर जिल्ह्यातील एक जिल्हा परिषद व 11 पंचायत समितीच्या 77 निवडणूक विभाग व 154 निर्वाचक गणांच्या प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.
या कार्यक्रमानुसार 2 जून 2022 ते 8 जून 2022 या कालावधीमध्ये प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना सुरू करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त हरकती व सूचना वर 14 जून 2022 रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे सुनावणी निश्चित केलेल्या आहेत.
प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना ग्रामपंचायत निवडणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे स्वीकारण्यात येतील, अशी माहिती उपजिल्हाधिकारी महसुल विठ्ठल उदमले यांनी दिली आहे.