अनील पंधे उद्यान भागातून महिलेचे साडेतीन तोळ्यांचे मिनी गंठण लुटले

सोलापूर शहरातील वसंत विहार भाग-2 येथील अनील पंधे उद्यान जवळून पायी जात असताना महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात चोरट्यांनी लुटून नेले आहे. याबाबत स्वाती विषाल रंपुरे (वय 35,रा. वसंत विहार भाग 2, बलदवा हॉस्पिटलजवळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रंपुरे व त्यांची बहीण बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास साई सुपर मार्केट येथे ते साहित्य आणण्याकरिता गेल्या होत्या. तेथून घराकडे परतत असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्याने रंपुरे यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे मिनी गंठण लुटून नेले आहे. त्यानंतर रामपुरे यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. फौजदार सोमनाथ देशमाने हे अधिक तपास करीत आहेत.