Latest Post

Пин Ап Казино — Официальный сайт Pin Up Casino Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş

उदगीर / प्रतिनिधी :

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाशी संलग्नित कृषि महाविद्यालय, डोंगरशेळकी तांडा, उदगीर येथील बी.एस.सी. कृषि पदवीच्या सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी मौजे पिंपरी येथे ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक संलग्नता २०२४-२५ अंतर्गत जनावरांचे लसीकरण घेण्यात आले. यावेळी पिंपरी व आवलकोंडा या गावाने सहभाग घेतला. यामध्ये रोगाचे लसीकरण व गर्भ तपसणी इत्यादी, करण्यात आले. या प्रसंगी पिंपरी गावाचे गावकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला.

यावेळी उपस्थित पशू वैद्यकीय डॉ. प्रफुल कुमार पाटील वेटरणारी कॉलेज व पशू वैद्यकीय डॉ. वी. वाटकर अवलकोंडा, पशुपालक, शेतकरी व इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थितीत होते. गावातील पशुपालक बिराजदार विनायक , बसवेशर बिराजदार, विकास बिराजदार, दत्ता केंद्रे व गायकवाड यांनी गायीचे लसीकरण करून घेतले. उपक्रमाचे नियोजन व आयोजन कृषी विद्यार्थी शेख अल्ताफ ,शेख मतीन , शेंडगे आदर्श, शिंदे दिव्यरतन, शिंदे ज्ञानेश्वर, शिंदे कुशाल, सोनकांबळे आदर्श ,केतन मसाळ, संगमेश मातमशेटी,राहुल मतलाकुटे,महेश मोरे,संकेत नाईक,प्रसाद मिटकरी
यांनी केले. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य ए.पी सुर्यवंशी, उप प्राचार्य ए.एम पाटील, कार्यक्रम समन्वय डॉ. एस. वानोळे, कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. आर. खंडागळे विशेष विषयतज्ञ डॉ. सागर खटके यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *