सातारा : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजीनामा द्यावा लागला तर वाटेल त्या परिस्थितीत देणारच,अशी भूमिका भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली आहे.मराठा आरक्षण सरकारने केले तर ठीक आहे, अन्यथा राजकारणाला रामराम करेन आणि राजीनामा देईन, असे मोठे विधान भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे. कोणाला न्याय देता येत नसले,तर पदावर राहून काय करायचे,असेही ते यावेळी म्हणाले.
मी कधी राजकारण केले नाही.आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजीनामा द्यावा लागला तर तो मी कोणत्याही परिस्थितीत देणारच.मी जे बोलतो ते मनापासून बोलतो.मी कधीही राजकारण केले नाही. त्यामुळे केवळ मराठा समाजासाठी नव्हे तर ज्यांच्यावर अन्याय होत असेल त्या सर्वांसाठी मी राजीनामा देणार. जर काही होत नसेल तर पदावर राहून काय उपयोग”, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.
Leave a Reply