शहरातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. सगळीकडेच खड्ड्यांची भरमार आहे. वाहन चालकांना हि खड्डे वाचवत आपली वाहन चालवणे म्हणजे जणू एक कसरतच करावी लागत आहे. हे खड्डे वाचविण्याच्या नादात वाहने एकमेकाला आदळून दुर्घटना होत आहेत. भर रस्त्यांमध्ये मोठे खड्डे निर्माण झालेले आहेत. ह्यावरती सुद्धा सोलापूर महानगर पालिका च्या अधिकाऱ्यांचे लक्ष नाही का असे सवाल जनतेच्या मनात उठत आहेत.
सोलापूरः शहरातील रस्त्यावर वाढत चाललेले खड्डे प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी आपच्या पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यात वृक्षारोपन करून प्रतिकात्मक आंदोलन केले. पुढील काळात खड्डे बुजवण्याचे काम तत्काळ न केल्यास आंदोलन तिव्र करण्याचा इशारा दिला आहे.
महावीर चौक येथे सिग्नल चालू असते, सिग्नल सुटल्यावर प्रत्येक वाहन चालक तत्परतेने वाहन नेऊ पाहतो आणि लगेच समोर एका मोठ्या खड्ड्यात आपली गाडी जाते आहे असे जाणून गाडी डावी किवां उजवीकडे घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे छोटे मोठे अपघात दररोजच होत आहेत.
आम आदमी पार्टी ने संबंधित अधिकाऱ्याला निवेदन देऊन कळकळी ची विनंती केली आहे कि 15 दिवसांचा एक कालबध्द कार्यक्रम आखून हे खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत. जी खड्डे अत्यंत धोक्याची वाटतात ती दोन दिवसात भरून रस्ते रहदारी साठी सुरळीत ठेवण्यात यावेत. सोलापूर च्या जनतेच्या ह्या समस्या जाणून घेऊन आम आदमी पार्टी तर्फे अधिकाऱ्याला विनंती करण्यात आलेली आहे कि वरील कामे एवढ्या दिवसात पूर्ण ना झाल्यास आम आदमी पार्टी तर्फे संबंधित झोन कार्यालया वर मोठे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या वेळी आपच्या पदाधिकाऱ्यांनी खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी एका खड्ड्यात वृक्षारोपन करून प्रतिकात्मक आंदोलन केले. यावेळी शहराध्यक्ष अस्लम शेख, उपाध्यक्ष हेमंत जाधव, सचिव बाबा सगरी, प्रवक्ता रहीम शेख, युवाध्यक्ष निहाल किरनळ्ळी, मॉयनॉरिटी विंगचे अध्यक्ष नासिर मंगलगिरी, रॉबर्ट गौडर, भारत अली यांनी इशारा दिला आहे.
Leave a Reply