अक्कलकोट : स्टेट इनोव्हेशन ॲण्ड रिसर्च फाऊंडेशन अर्थात सर फाऊंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ‘सर फाऊंडेशन टीचर इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड २०२०’ साठी अक्कलकोट तालुक्यातील नागणसुर येथील जिल्हा परिषद कन्नड मुलींच्या शाळेतील उपक्रमशील शिक्षक शरणप्पा फुलारी यांना जाहीर झाला आहे.
त्यांनी राबवलेल्या ‘दफ्तरविना शाळा’ या उपक्रमाला हा पुरस्कार मिळाला असून त्यांच्या या उपक्रमाची तालुक्यात चर्चा होत आहे.दरवर्षी सर फौंडेशनच्यावतीने राष्ट्रीय पातळीवर नवनवीन नवोपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता व शाळेचे गुणवत्ता वाढविण्यासाठी राबवलेल्या उपक्रमशील शिक्षकांना सन्मानित केले जाते.देशभरातील १६ राज्यांतील १६९ प्रयोगशील शिक्षक व क्षेत्रीय अधिकारी यांना इनोव्हेशन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.त्यात नागणसुर कन्नड मुलींची शाळेचे नाव देश पातळीवर पोहोचले आहे.
जून 2019 मध्ये नागणसुर कन्नड मुलींच्या शाळेत हजर झाल्यापासून नवनवीन उपक्रम राबवून गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे.दप्तरविना शाळा हा उपक्रम राबवून दर शनिवारी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दफ्तरचे ओझे कमी करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला.दर शनिवारी,संगीत,कला,शारीरिक,शिक्षण,प्रश्नमंजुषा,प्रेरणादायी मुलाखत,गायन,वादन, नृत्य,नाट्य,काव्यलेखन,वाचन,कथाकथन, चित्रकला आदी विषयांची प्रत्यक्ष माहिती प्रशिक्षण दिल्यामुळे शाळेतील विद्यार्थिनी वर्षभरात बालसाहित्य संमेलनासाठी विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
शरणप्पा फुलारी यांच्या यापूर्वी बबलाद शाळेतील लोकसहभागातून शाळा समृद्धी या नवोपक्रमाला दोन राष्ट्रीय पुरस्कार व एक महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कार मिळाला आहे. लोकसहभागातून शाळा समृद्धी उपक्रम शिक्षणाच्या वारी साठी संपूर्ण महाराष्ट्रात निवड झाली होती.
या पुरस्काराचे वितरण सर फाऊंडेशन, स्टेम व जस्ट लर्निंग कडून डिसेंबर २०२० मध्ये आयोजित राष्ट्रीय स्तर ‘एज्युकेशनल इनोव्हेशन्स कॉन्फरन्स २०२० मध्ये करण्यात येणार आहे.
Leave a Reply