Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

किरण खरटमल / सोलापूर

म्हणतात ना कोरोनान जगणं शिकवलं, पण कोणासाठी ज्याच्याकडे भाकर आहे त्यांच्यासाठी, काही गरिबांना दानशूर व्यक्तींनी मदत केली, तर मायबाप सरकारने मोफत रेशन कार्ड वर धान्य, दाळ, तेल दिले. पण सर्वात मोठी संक्रांत आली ती म्हणजे लोकांच्या दयेवर जगणाऱ्या भिकारी लोकांवर. त्यांची व्यथा मांडली आहे. लॉकडाऊन 75 रुपये या लघु चित्रपटाच्या माध्यमातून. सोलापुरातील या युवकांचा एक आगळावेगळा प्रयत्न लोकांना भावतोय. सध्याला त्याच प्रमोशन मोठ्या प्रमाणावर जोर धरत आहे. यामध्ये भूमिका करणाऱ्या कलाकारांचे कौतुक सोलापुरातील प्रेक्षक करत तर आहेतच पण नेटिझन्स याकडे आतुरतेने पाहत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

“कतार बडी लम्बी थी,
के सुबह से श्याम हो गयी…
ये दो वक्त की रोटी,
आज फिर मेरा अधूरा ख्वाब हो गयी…”

सगळीकडेच महामारीचे थैमान घालणा-या कोरोना या साथीच्या रोगाने सर्वजगासह भारतात देखिल कहर माजवून सर्व स्तरातील प्रत्येक घटकाला दयनीय स्थितीत आणले…
यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सरकरने कडक लाॅकडाऊन जाहिर केले खरे…परंतू याचे परिणाम समाजातील सर्वच घटकांना भरडून काढणारे होते…
अश्या परिस्थितीत समाजातील एक दुर्लक्षित व दुस-यांनी दिलेल्या दया-दानावर विसंबून असलेला घटक म्हणजे भिकारी…यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन आतोनात हाल झाले….

एस.राम.जी. प्राॅडक्शन यांची ही निर्मित असून सनी खेरवाल यांनी या लघुचित्रपटाचे अतिशय उत्तम दिग्दर्शन केले आहे तसेच छायाचित्रण बिरू खंडे यांनी केले आहे तर संकलन सचिन जगताप यांचे आहे…

या लघुचित्रपटात मुख्य भुमिकेत राहुल चवरे व अस्लम अरब हे असून मनोज टोणपे, श्रद्धा हुल्लेनवरू, रेखा रणसुभे, विकास सुरवसे, रमेश परशी, रोहित कांबळे, शिवा जारहाळ्ळी इत्यादींच्या सकस भुमिका आहेत. तसेच याचे संगीत यसपी, पुणे यांनी तर डब्बींग मेहबूब स्टुडिओ, सोलापुर येथे झाले आहे…

‘लंगड्या’ नांवाच्या दोन्ही पायाने अपंग असलेल्या एका भिका-याचा लाॅकडाऊन मध्ये पोटाची आग विझवून जिवंत राहण्यासाठीचा खडतर प्रवास, येणारे अनुभव व मिळालेली शिकवण…म्हणजेच हा लघुचित्रपट…”लाॅकडाऊन 75रू”…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *