राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरु करण्यास परवानगी दिली असून आजपासून बुकिंग सुरु असल्याचं मध्य रेल्वेनं जाहीर केलं आहे.महाराष्ट्रात अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात जिल्हाबंदी उठवण्यात आल्याने खूप मोठा दिलासा मिळाला आहे. एसटीनंतर खासगी बसवाहतुकीचा मार्ग खुला झाला असताना मध्य रेल्वेनेही आज मोठा दिलासा दिला आहे .
यासंदर्भातील एक पत्रकच मध्य रेल्वेन रेल्वेनं जारी केलं असून राज्यांतर्गत प्रवासासाठी २ सप्टेंबरपासून तिकीट बुकींग करता येणार आहे.तसेच आरक्षण पद्धतीने आजपासून २ सप्टेंबरपासून राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु होणार असल्याचंही पत्रकात स्पष्ट केलं आहे.दरम्यान, देशभरात मार्च महिन्यात लॉकडाऊनमुळे प्रवासी रेल्वे वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले होते.
२ सप्टेंबरपासून राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाचे बुकिंग प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर करता यईल, असे मध्य रेल्वेने नमूद केले आहे. मध्य रेल्वेचे मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक डी. वाय. नाईक यांनी याबाबतचं पत्र राज्याचे मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर आणि परिवहन सचिव अशोक कुमार सिंग यांना पाठवलं आहे. याचा फार मोठा दिलासा प्रवाशांना मिळणार आहे. या प्रवासी वाहतुकीचे नियम लवकरच स्पष्ट होणार आहेत .