आज ग्रामीण भागात पॉझिटिव्ह 182; तर 8 जणांचा मृत्यू

आज गुरुवारी दि.15 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 182 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 111 पुरुष तर 71 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 267 आहे. आज 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 978 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 796 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 28 हजार 577 इतकी झाली आहे. यामध्ये 17,657 पुरुष तर 10,920 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 795 जणांचा मृत्यू झाला आहे यात 565 पुरुष तर 230 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 4 हजार 101 आहे .यामध्ये 2 हजार 958 पुरुष तर 1143 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 23 हजार 681 यामध्ये 14,134 पुरुष तर 9547 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 3 तर ग्रामीण 2

बार्शी –नागरी 8 तर ग्रामीण 2

करमाळा –नागरी 1 ग्रामीण 6

माढा – नागरी 2 तर ग्रामीण 6

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 45

मंगळवेढा – नागरी 1, ग्रामीण 4

मोहोळ – नागरी 6 ग्रामीण 20

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 2

पंढरपूर – नागरी 10 ग्रामीण 8

सांगोला – नागरी 6 ग्रामीण 45

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 5

आजच्या नोंदी नुसार नागरी – 37 तर ग्रामीण भागात 145 असे एकूण 182 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.