- दाखले काढण्यासाठी होत होती गर्दी
- ‘आप’ने तक्रार केल्यामुळे वृद्धना दिलासा, आता बँकेकडे हयातीचे दाखले पाठवण्यासाठी सूचना
सोलापूर, प्रतिनिधी
निराधार योजनांसाठी हयातीचा दाखला बंधनकारक आहे. हयातीच्या दाखल्यासाठी शहर व ग्रामीण भागातील वृद्ध मोठ्या संख्येने संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना विभागासमोर गर्दी करत होते. त्यामुळे ज्येष्ठांना नाहक त्रास होतो त्यामुळे आपने निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांना तक्रार केली. हयातीचे दाखले आता संजय गांधी निराधार योजना विभागाकडे देण्याची आवश्यकता नाही असे सूचित वाघमारे यांनी केले. पूर्वीप्रमाणे संबंधित बँकांकडे हयातीचे दाखले पाठवा असे ही त्यांनी सांगितलं. आम आदमी पार्टीच्या तत्परतेमुळे संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनेच्या 26 हजार लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
संजय गांधी निराधार योजना या विभागात सकाळी 9 वाजल्यापासून सुमारे 400 ते 500 वृद्ध लाभार्थी गर्दी करत होते आणि प्रशासनाकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे फक्त २५० ते ३०० लाभार्थींना हयातीचे दाखले मिळत होते व त्यासाठी दिवसभर कार्यालयासमोर खुप मोठया रांगांमध्ये ताटकळत उभे रहावे लागत होते. कित्येकजण उपाशीपोटी रहायचे. गर्दीमुळे सोशल डिस्टंसिंग पाळले जात नव्हते आणि वरिष्ठ नागरिक जे कोरोना महामारीला अति संवेदनशील आहेत त्यांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता जास्त होती.
आम आदमी पार्टी चे रॉबर्ट गौडर यांनी ही बाब लक्षात येताच शहराध्यक्ष मो. अस्लम शेख यांना सोबत घेत लगेचच वरील योजनेचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाठ यांची भेटू घेऊन परिस्थिती समजून सांगितली व गर्दी संपवण्याचे व लाभार्त्यांची योग्य ती सोय करण्याचे सुचविले. यावर तोडगा निघत नसल्याचे दिसताच लगेचच आम आदमी पार्टीचे पदाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्याकडे जाऊन तक्रार केली. निराधार योजना विभागासमोर होत असलेली गर्दी आणि वृद्धांमध्ये कोरोना चे संसर्ग वाढण्याची शक्यता याची आपण दखल घ्याला हवी व योग्य ते निराकरण तात्काळ करावयाची विनंती केली. लगेच निवासी जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी ह्यावर अंमलबजावणी करीत हयातीचे दाखले आता संजय गांधी निराधार योजना विभागाकडे देण्याची आवश्यकता नाही असे सूचित केले. आणि पूर्वीप्रमाणे संबंधित बँकांकडे हयातीचे दाखले पाठवा असे ही त्यांनी सांगितलं.
या आदेशामुळे शहरातले 26,722 लाभार्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे वृद्धांना, अपंगांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही आणि कोरोना पासुन पण त्यांचे बचाव होणार आहे.
आम आदमी पार्टीच्या ह्या कामामुळे जनतेतून प्रशंसा व्यक्त करण्यात येत आहे. आम आदमी पार्टी सोलापूरचे शहराध्यक्ष अस्लम शेख यांनी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांचे आभार मानत हे फक्त निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या तत्परतेमुळे शक्य झाले असल्याचे वक्तव्य केले. यावेळेस, आम आदमी पार्टी चे रॉबर्ट गौडर, असिफ शेख व निहाल किरनळ्ळी हे उपस्थित होते.