Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

विशेष प्रतिनिधी /सोलापूर

सोलापूर शहर परिसर आयपीएल सट्टा बाजार जोरात असल्याची वृत्तमालिका MH 13 न्यूजवर प्रकाशित होत झाली.त्याची दखल घेऊन शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार क्राईम ब्रांचने धडाकेबाज कारवाई करून आयपीएल कंपनीच्या दांड्या उडवल्या आहेत .परराज्यातील असलेलं कनेक्शन ट्रॅक लावून गुन्हे शाखेने उध्वस्त केले. आणि आता तर सोलापुरातील आयपीएल सट्टा लिंक नागपुरात असल्याचं लक्षात येताच त्या ठिकाणी जाऊन तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. क्राइम ब्रांच नाही दिवाळीत धडक कारवाईचा ॲटम बॉम्ब फोडला आहे.

6 नोव्हेंबर रोजी सोलापुरातील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आयपीएल सट्टा चालवत असल्याप्रकरणी ताब्यात घेतलं होतं. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील कलबुर्गी येथून 10 नोव्हेंबर रोजी आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे.

अटक केलेल्या या चार ही आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, या सट्टा प्रकरणाचे धागेदोरे नागपूर पर्यंत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली.त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सोलापूर शहर गुन्हे शाखेने नागपुरात जाऊन आणखी तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

विशेष म्हणजे सोलापूर आणि कलबुर्गीतून ताब्यात घेतलेले आरोपी नागपुरातील मुख्य बुकी असलेल्या रिंकू अग्रवाल याच्याकडे सट्टा लावत होते. मात्र कोणत्याही आरोपीने रिंकू अग्रवालला पाहिले देखील नव्हते. केवळ विश्वासाच्या आधारे फोनद्वारे हा सगळा प्रकार सुरु होता. त्यामुळे आरोपींचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र तांत्रिक बाबी आणि खबऱ्यांच्या माहितीमुळे पोलिसांना आरोपींना ताब्यात घेण्यात यश आलं आहे.

सोलापूर शहर गुन्हे शाखेचे एक पथक मागील 4 दिवसांपासून नागपूरमध्ये थांबून होते. खबऱ्यांमार्फत आरोपीचा सुगावा लागताच वरीष्ठ अधिकाऱ्यांसह दुसरे पथक देखील नागपूरला रवाना झाले. नागपूर जिल्ह्यातील उमरेड रोडवरील एका फार्महाऊसवर पोलिसांना छापा टाकत सट्टा प्रकरणातील मुख्य संशयित बुकी रिंकु उर्फ अमित अग्रवाल, सुनील शर्मा, राहूल काळे या तिघा आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून सट्ट्यासाठी वापरलेले लॅपटॉप, मोबाईल आणि इतर मुद्देमाल देखील पोलिसांना जप्त केल्याची माहिती आहे.

काल आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना उमरेडच्या न्यायलयात हजर करुन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर आरोपींना घेऊन सोलापूरकडे रवाना झाले आहेत. आज आरोपींची वैद्यकीय चाचणी करुन त्यांना न्यायलयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.

सोलापूर आणि कलबुर्गीतून अटक कऱण्यात आलेल्या 4 आरोपींकडून पोलिसांनी 38 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला होता. आता नागपुरातून ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून देखील लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. मागील जवळपास 12 दिवसांपासून सोलापूर शहर गुन्हे शाखेचे पथक विविध ठिकाणी छापा टाकत आहेत. गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे, उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *