सोलापूर, प्रतिनिधी
शहरातील कोणत्याही शाळेकडून आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेच्या नियमांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. ह्या बद्दल तक्रारी चे निवेदन आम आदमी पालक युनिअन सोलापूर मार्फत प्रशासन अधिकारी महानगर पालिका सोलापूर ह्यांना देण्यात आले. जर मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करू असा इशाराही निवेदनात दिला आहे.
प्रशासन अधिकारी कार्यालयाकडून वरील प्रवेश प्रक्रियेच्या नियमांच्या अंमलबजावणी बाबत आदेश संबधित शाळेना देण्यात आले आहेत का. त्याचे काटेकोरपणे पालन होत नसल्यास आपल्या कडून कोणती कारवाई करण्यात येत आहे. जर शाळा नियमांचे उल्लंघण करत असतील तर शासनाचे धोरण साध्य कसे होणार आणि त्यास कोण जबाबदार? शाळेतील प्रवेशासाठी वंचित व दुर्बल गटातील मुलं शाळा दाखल्या पासून वंचित राहिल्यास त्यास प्रशासन अधिकाऱ्यास का जबाबदार धरण्यात येऊ नये? अशे थेट प्रश्न विचारण्यात आले आहेत. संदर्भीय नोटिफिकेशन च्या नियमांची अंमलबजावणी पूर्ण २० शाळांमध्ये पुढील २ दिवसात न झाल्यास शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी विरोधात आंदोलन करू असा इशारा आम आदमी पालक युनिअन ने दिला आहे.
ह्या वेळी आम आदमी पालक युनिअन अध्यक्ष रॉबर्ट गौडर, इम्रान सगरी, सचिन मिश्रा, संतोष कासे, चिन्मय निकते, विजय हिरेमठ, इम्रान मुजावर, अस्लम शेख आदी उपस्थित होते.