आम आदमी पार्टीच्या वतीने उपजिल्हाधिकार्यांना निवेदन
वाहतूक पोलिसांतर्फे आणि आर.टी.ओ. चे अधिकारी कर्मचारी यांच्या तर्फे चार चाकी वाहन, रिक्षा मालकावर आणि चालकावर होत असलेल्या त्रासामुळे तीव्र निषेध नोंदवत निवासी उपजिल्हाधिकारी, आयुक्त (सो. म. पा.), पोलीस आयुक्त तसेच मा. पोलीस आयुक्त (ग्रामीण) यांना आम आदमी पार्टी तर्फे निवेदन देण्यात आले आहे.
सोलापूर जिल्हा व शहर हद्दीमध्ये नोंदणीकृत अनेक चार चाकी वाहने ही परराज्यात, परजिल्ह्यात ये जा करत असतात. जिल्हाधिकारी सोलापूर यांनी चार चाकी वाहनांमध्ये फक्त एकूण 4 व्यक्तींनाच प्रवासाची आज्ञा दिलेली आहे. नियम हा सरकारी वाहने अर्थात एस.टी., खासगी प्रवासी वाहने उदा. – ट्रॅव्हल्स बसेस यांना लागू नाही. आणि तसेच रिक्षा मध्ये फक्त 2 व्यक्तींना बसण्याची परवानगी दिलेली आहे.
वाहन चालक व मालक यांची दुर्दशा झालेली आहे. लॉकडाउन मुळे बँकांचे हफ्ते व कर्ज थकलेले आहे. तसेच सांसारिक, प्रापंचिक जीवनाची दुर्दशा झालेली आहे. कोविड मुळे वाहन चालक मालकांची आर्थिक धूळदाण उडालेली आहे. त्यांच्या कुटुंबियांना उपासमारी ला समोरे जावे लागत आहे. नैराश्यातून त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ ओढावली आहे. असे असता सबब सदर चार चाकी चालक व मालकांवर दंड आकारू नये अशा संबंधितांना सूचना देण्यात यावे अशी मागणी आम आदमी पार्टी तर्फे निवेदनात करण्यात आले.
यावेळेस, आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री सागर पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष ऍड. खतीब वकील, उपाध्यक्ष प्राजक्त चांदणे, युवाध्यक्ष निहाल किरनळ्ळी, प्रवक्ता रहीम शेख, तसेच चालक मालक संघटनेचे अध्यक्ष श्रीशैल कलशेट्टी, सचिव दिलीप आळंद, सिद्धाराम ख्यडगी व अनेक चालक मालक मोठ्या संख्येत उपस्थित होते.