Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

 

मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांच्या चिठ्ठीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आपली बदली होणार असल्याची माहिती त्यांना होती. त्यामुळे त्याच्या एक दिवस आधी चॅट मधून पुरावे तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.या चॅटमध्ये गृहमंत्री ना. अनिल देशमुख हे शेवटच्या आठवड्यात सचिन वाझे यांना भेटले आहेत असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र देशमुख हे विदर्भ दौऱ्यावर असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती असा खुलासा राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली होती,त्यानंतर २७ फेब्रुवारी पर्यंत त्यांनी स्वतःला होम आयसोलेट केले होते. एक दिवस ते लोकांना भेटले असता त्याबाबत पुरावे तयार करून त्यांना बदनाम करण्याचे कट-कारस्थान कुठेतरी केले जात आहे. या प्रकरणी केले गेलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. त्याची सखोल चौकशी करण्यात येईल आणि सत्य बाहेर येईल. चौकशीतून जे निष्पन्न होईल त्याद्वारे पुढील कारवाई होईल. त्यामुळे तूर्तास मंत्री महोदय ना. अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, असा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *