Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर एका वर्षाने अभिनेत्री ते नेता असा प्रवास केलेल्या उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) या मंगळवारी शिवसेनेत  प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. मातोंडकर यांनी २०१९मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेआणि त्यांचे निकटवर्तीय सहकारी हर्षल प्रधान यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मातोंडकर यांचे नाव राज्यपालांच्या कोट्यातून  विधानपरिषदेसाठीच्या  उमेदवारांच्या यादीतही आहे. महाविकासआघाडी सरकारकडून १२ नावांची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींकडे  पाठवण्यात आली आहे. अद्याप या यादीला राज्यपालांची स्वीकृती मिळालेली नाही.

अंतर्गत राजकारणामुळे सोडली काँग्रेस…
२०१९च्या लोकसभा निवडणुकींच्या पाच महिने आधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या उर्मिला मातोंडकर यांनी गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात अंतर्गत राजकारणाचे कारण देत काँग्रेस सोडल्याचे जाहीर केले होते. त्यांनी म्हटले होते की त्यांची राजकीय आणि सामाजिक संवेदना मुंबई काँग्रेसमध्ये एका मोठ्या लक्ष्यासाठी काम करण्याऐवजी उथळ राजकारणात भाग घेण्याची त्यांना परवानगी देत नाहीत. त्यांनी काँग्रेसच्या मुंबई विभागाच्या कामकाजामुळे पक्ष सोडला होता.

काय म्हणाल्या होत्या उर्मिला मातोंडकर?
एका वक्तव्यात त्यांनी म्हटले होते, ‘मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून राजीनामा देत आहे. राजीनामा देण्याचा विचार पहिल्यांदा माझ्या मनात तेव्हा आला जेव्हा पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही १६ मे रोजी मी दिलेल्या पत्राच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने काहीही पावले उचलण्यात आली नाहीत. तत्कालीन मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांना मी पत्र लिहिले होते. यानंतर विशेष अधिकारांतर्गत लिहिलेले आणि गोपनीय असलेले ते पत्र माध्यमांमध्ये फोडण्यात आले जो माझ्यामते एक विश्वासघात होता. मी पुन्हापुन्हा विरोध करूनही कोणीही पश्चात्ताप किंवा काळजीही दाखवली नाही.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *