शहर कार्याध्यक्षपदी मोईन शेख यांची निवड
शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी केली घोषणा
सोलापूर, प्रतिनिधी
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएमच्या शहर युवक अध्यक्षपदी मोसिन मैंदर्गिकर, कार्याध्यक्षपदी मोहन शेख यांची निवड करण्यात आल्याची घोषणा शहराध्यक्ष फारुख शेख यांनी आज शनिवारी केली.
आज शनिवारी दारुस्सलाम एमआयएम शहर व जिल्हा मुख्यालय पासपोर्ट कार्यालयासमोर, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या संघटन मजबुतीकरणासाठी युवा नुतन कार्यकारणी निवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या उपस्थित शहर युवकअध्यक्ष मैंदर्गिकर यांना नियुक्तीचे पत्र, हिरवा शेला, बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा मुल्ला, नगरसेविका वाहेदा भंडाले , नगरसेवक गाझी जहागीरदार , मुकरी सालार, रिझवान हवालदार, गुलाब बागवान, मेडिकल जिल्हध्यक्ष महजर कुरेशी, वाहतूक जिल्हाध्यक्ष रियाज सय्यद, कामगार जिल्हाध्यक्ष शकिल शेख, विद्यार्थी जिल्हध्यक्ष इस्माईल नदाफ, व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महापौरपद घेण्यासाठी एमआयएम महापालिका निवडणूक लढवणार
आगामी महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएमचा महापौर झाला तर फक्त ज्या ठिकाणी एमआयएमचे नगरसेवक आहेत तेच वॉर्ड चांगले होईल असे नाही, पूर्ण सोलापूर शहराचा विकास करू. एमआयएम हा पक्ष केवळ दलित आणि मुस्लिमांचा पक्ष आहे असे लोकांमध्ये गैरसमज आहे मात्र तसे काही नाही एमआयएम पक्ष सर्व धर्मासाठीचा पक्ष आहे. पक्षासोबत काम करून बघा आपला गैरसमज दूर होईल. एमआयएम पक्ष हा युवकांचा पक्ष आहे, सर्वाधिक युवक या पार्टीसोबत सोबत आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी काम करा, युवकांचे प्रश्न सोडवा असे आवाहन शब्द यांनी केले.