दि.8 : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये जमुडिहाबाशी गावात कंप्युटर बाबा (नामदेव दास त्यागी) आश्रम आहे. 40 एकरहून अधिक परिसरात हा आश्रम पसरलेला आहे. कंप्युटर बाबांच्या गोमतीगिरी आश्रमात बेकायदा बांधकामे करण्यात आली होती.
जिल्हा प्रशासनानं रविवारी सकाळी कंप्युटर बाबांच्या आश्रमावर धडक कारवाई केली आहे. कंप्युटर बाबांकडून करण्यात आलेलं अतिक्रमण तातडीनं हटवण्यासाठी जिल्ह्या प्रशासनानं बुलडोजर आणून कारवाई केली आहे. या कारवाईला विरोध करणाऱ्या कंप्युटर बाबांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
कंप्युटर बाबांच्या गोमतीगिरी आश्रमातील बेकायदा बांधकामे तोडण्याची कारवाई जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने सुरू करण्यात आली. त्यावेळी स्थानिक आणि आश्रमातील व्यक्तींनी या कारवाईत व्यत्यय आणू नये म्हणून पोलिसांना मोठा फौजफाटा तैनात कऱण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासन मध्य प्रदेशातील इंदूरने आज मोठी कारवाई करत जिल्हाधिकारी मनीष सिंह, एडीएम अजय देव शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जमुडिहाबाशी गावात नामदेव दास त्यागी (कंप्युटर बाबा) यांनी केलेले अतिक्रमण हटविले असून एडीएम अजयदेव शर्मा व अन्य एसडीएम व पोलिस अधिकाऱ्यांची टीम आज सकाळपासून कारवाई करीत आहे. कंप्युटर बाबांच्या आश्रमातील बेकायदा बांधकाम तोडण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने जे अतिक्रमण पाडलं आहे त्याची साधारण किंमत 80 कोटी रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. 40 एकरहून अधिक परिसरात पसरलेला या आश्रमावर पालिकेनं बुलडोजर चालवला. या ठिकाणी नेमकं काय विकास करायचा यासंदर्भात महापालिकेकडून आराखडा तयार केला आहे.