Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

पंढरपूर : शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करू परंतु आषाढी वारी प्रमाणे कार्तिकी यात्रेत मंदिर परिसरात संचारबंदी करू नका अशी मागणी शासन दरबारी महाराज मंडळींनी केली आहे.
कार्तिकी वारी संदर्भात वारकरी संप्रदायाची भूमिका मांडण्यासाठी महाराज मंडळांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी रामकृष्ण वीर महाराज, राणा महाराज वासकर, भागवत महाराज चवरे, विष्णु महाराज कबीर, मनोहर महाराज बेलापुरकर, रंगनाथ महाराज राशनकर, जगन्नाथ महाराज देशमुख, देविदास महाराज ढवळीकर, एकनाथ महाराज हांडे, चैतन्य महाराज देहूकर, गणेश महाराज कराडकर, श्याम महाराज उपळीकर यांच्यासह अन्य महाराज उपस्थित होते.
आषाढी यात्रेत वारकरी संप्रदायाने सहकार्य करावे. शासनाने कार्तिकी यात्रेत वारकऱ्यांना सहकार्य करावे.प्रत्येक मठात ५० लोक राहण्याची परवानगी द्यावी. परंपरा टिकावी यासाठी सकाळी ६ ते दुपारी १२ वाजे पर्यंत नगर प्रदक्षिणा करू द्यावी. यात्रा कालावधीत वारकऱ्यांना मदत नाही केली तर पुढील सर्व निवडणुकीत मतदान करणार नाही.
शासनाने कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करावे. जर मंदिर भाविकांसाठी खुले करणे शक्य नसेल तर किमान मंदिराचे दरवाजे तरी उघडा वे अशी मागणी महाराज मंडळींनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *