नवी दिल्ली, दि.13 :
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे तसेच
श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
कोरोनाची लागण झाल्यानंतर अमित शाह यांना 2 ऑगस्ट रोजी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मागील आठवड्यात म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी ते कोरोनामुक्त झाले होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुन्हा एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. शनिवारी रात्री 11 वाजता त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं.अमित शाह यांना एम्समधील कार्डियो न्यूरो टॉवरमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी कोरोनावर मात केली होती.एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्त्वात अमित शाह यांच्यावर उपचार सुरु होते. महत्त्वाचं म्हणजे त्यांची कोरोना चाचणी देखील निगेटीव्ह आली आहे.
कोरोनामुक्त होऊन आल्यानंतर गृहमंत्री अमित शहा कोणाला भेटतही नव्हते. अचानक त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
केंदीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. शिवाय, त्यांची प्रकृती देखील स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. मागील दीड महिन्यात तीन वेळा शाह यांना रुग्णालयात दाखल व्हावं लागलेलं आहे.या अगोदर 18 ऑगस्ट रोजी शाह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना 31 ऑगस्ट रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.