राज्यात कोरोनाचा संसर्ग पूर्ण नियंत्रणात येत असल्याचे दिसत असतानाच पुन्हा एकदा या विषाणूंच्यामुळे बाधित होण्याचे प्रमाण वाढत आहे.या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या सभापतींनी पुन्हा एकदा प्रवासी वाहतुकीसाठी जाणाऱ्या बसचे निर्जंतुकीकरण करणे सुरू केले आहे. आज मंगळवारी सकाळी परिवहन सभापती जय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीसाठी निघणाऱ्या बसेसचे सॅनीटायझेशन
करण्यास सुरुवात झाली.
सॅनीटायझेशन करणे गरजेचे…
राज्यात पुन्हा एकदा बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.राज्यात काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन झाले. सोलापूरात पुन्हा लॉकडाऊन होईल की काय अशी भीती नागरिकांमध्ये आहे त्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याची काळजी याची जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी वाहतुकीसाठी जाणाऱ्या बसेसचे सॅनीटायझेशन करणे आवश्यक आहे.
जय साळुंखे
परिवहन सभापती, सोलापूर