सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज रविवारी दि.13 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 601 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 392 पुरुष तर 209 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 136 आहे. आज 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यात 11 पुरुष तर 2 महिलांचा समावेश होतोय.
आज एकूण 4068 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 3405 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 17 हजार 339 इतकी झाली आहे. यामध्ये 10,619 पुरुष तर 6720 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.
आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 494 जणांचा मृत्यू झाला आहे यात 344 पुरुष तर 150 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 5 हजार 906 आहे .यामध्ये 3 हजार 751 पुरुष तर 2115 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 10 हजार 939 यामध्ये 6521 पुरुष तर 4418 महिलांचा समावेश होतो.
अक्कलकोट -18
बार्शी – 102
करमाळा – 43
माढा – 89
माळशिरस – 106
मंगळवेढा – 39
मोहोळ – 24
उत्तर सोलापूर – 4
पंढरपूर – 93
सांगोला – 78
दक्षिण सोलापूर – 5
सोलापूर जिल्ह्यातील नागरी -208 तर ग्रामीण भागात 393 असे एकूण 601 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.