Latest Post

“1win Casino Resmi Site, Bahis Ofisi, Slotlar, Oyun Makineler ️ 1win En Côte D’ivoire ᐈ Rome Sportifs Et Sobre Casi

आज गुरुवारी दि.26 नोव्हेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 193 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 122 पुरुष तर 71 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 104 आहे. आज 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 3162 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2969 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 34 हजार 959 इतकी झाली आहे. यामध्ये 21,644 पुरुष तर 13,315 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1026 जणांचा मृत्यू झाला आहे यात 737 पुरुष तर 289 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 763 आहे .यामध्ये  1312 पुरुष तर 451 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 32 हजार 170 यामध्ये 19,595 पुरुष तर 12,575 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 1 तर ग्रामीण 0

बार्शी –नागरी 6 तर ग्रामीण 5

करमाळा –नागरी 3 ग्रामीण 8

माढा – नागरी 4 तर ग्रामीण 12

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 39

मंगळवेढा – नागरी 5 ग्रामीण 11

मोहोळ – नागरी 7 ग्रामीण 1

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 9

पंढरपूर – नागरी 25 ग्रामीण 29

सांगोला – नागरी 16 ग्रामीण 9

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 3

आजच्या नोंदी नुसार नागरी – 67 तर ग्रामीण भागात 126 असे एकूण 193 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *