ग्रामीण | नवे 48 रुग्ण ‘या’ भागातील… वाचा

शेखर म्हेञे

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असुन आज दिनांक 13 मार्च शनिवारी 48 रूग्ण आढळून आले.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या रूग्ण वाढी मुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कडक नियम करावे लागणार आहे.

आज माढा तालुक्यातील ‘या’ भागात 48 जणांचा अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी शिवाजी थोरात यांनी दिली.

कुर्डूवाडी 2, माढा 2, धानोरे 4, विठ्ठलवाडी 1, बेंबळे 2, व्होळे 1 निमगाव टे. 13, आंबाड 1, टेंभुर्णी 15, अकोले खु 2, सापटणे टे 1, रूई 1, मानेगाव 1, भोसरे 1,भुताष्टे 1, या गावात बाधित व्यक्ती आढळून आले आहेत. आज एकुण 48 रूग्ण वाढ झाली असुन ही माढा तालुक्यासाठी चिंतेची बाब आहे.