सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज सोमवारी दि.28 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 378 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 231 पुरुष तर 147 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 250 आहे. आज 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 1519 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1141 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 24 हजार 374 इतकी झाली आहे. यामध्ये 15,015 पुरुष तर 9359 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.
आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 666 जणांचा मृत्यू झाला आहे यात 469 पुरुष तर 197 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 6 हजार 397 आहे .यामध्ये 4 हजार 294 पुरुष तर 2103 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 17 हजार 311 यामध्ये 10250 पुरुष तर 7061 महिलांचा समावेश होतो.
अक्कलकोट -नागरी 2 तर ग्रामीण 3
बार्शी –नागरी 56 तर ग्रामीण 15
करमाळा –नागरी 7 ग्रामीण 18
माढा – नागरी 6 तर ग्रामीण 28
माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 94
मंगळवेढा – नागरी 5 ,ग्रामीण 13
मोहोळ – नागरी 9 ग्रामीण 22
उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 5
पंढरपूर – नागरी 28 ग्रामीण 49
सांगोला – नागरी 5 ग्रामीण 9
दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 4
आजच्या नोंदी नुसार नागरी -118 तर ग्रामीण भागात 260 असे एकूण 378 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.
Leave a Reply