देशभरात पुन्हा कोरोना चा संसर्ग वाढताना दिसून येत आहे. दिवसेंदिवस संसर्गित रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत असून गेल्या चोवीस तासात देशभरात 46 हजाराहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
शुक्रवारी आलेल्या आकडेवारीच्या तुलनेत एक हजार रुग्ण अधिक आढळून आले आहेत.
नवीन रुग्णांची भर पडल्याने देशातील एकूण रुग्णसंख्याही वाढली आहे.
गेल्या २४ तासांत देशात ४६ हजार २३२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्णवाढ झाल्याने देशातील एकूण रुग्णसंख्या ९० लाख ५० हजार ५९८ वर पोहोचली आहे.
त्याचबरोबर देशात २४ तासांत ५६४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील एकूण करोना मृतांची संख्या १ लाख ३२ हजार ७२६ इतकी झाली आहे.
सध्या देशात ४ लाख ३९ हजार ७४७ रुग्ण उपचार घेत आहेत.
करोनाचा रुग्ण सापडल्यापासून आतापर्यंत देशात ८४ लाख ७८ हजार १२४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.
तर गेल्या २४ तासांत ४९ हजार ७१५ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे.
देशात गेल्या २४ तासांत १० लाख ६६ हजार २२ चाचण्या करण्यात आल्या.