श्री सिद्धेश्वर सह.साखर कारखान्याच्या ५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी सोलापूर विकास मंच आणि कारखानाच्या अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी विषयी व्यक्तव्य करणार्या व्यक्तींवर असंवेदनशील असभ्य भाषेत सार्वजनिकरीत्या धमकीवजा चितावणीखोर भाषण केले. सदर भाषणामुळे सोलापूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर यांच्याकडे धर्मराज काडादी यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्या विषयीची तक्रार केली आहे.
सोलापूर विकास मंच च्या माध्यमातून आजपर्यंत अभ्यासपूर्ण आणि संवैधानिकरित्या सोलापूरच्या विकासाशीनिगडित प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सोलापूर विकास मंच च्या वतीने नागरी विमानसेवेस अडथळा निर्माण करणार्या श्री सिद्धेश्वर सह.साखर कारखान्याच्या अनाधिकृत बेकायदेशीर को जनरेशन चिमणी विषयी सातत्याने पाठपुरावा सर्व स्थारातुन प्रमाणिकपणे सुरू आहे. नुकतेच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने चिमणी पाडकामाविषयी टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
धर्मराज काडादी यांनी कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सार्वजनिकपणे चितावणीखोर धमकीवजा भाषण करुन सभासदांना भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. सदर भाषणाचा परिणाम सोलापूरच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर होणार आहे असे सोलापूर विकास मंचच्या वतीने उपायुक्त देण्यात आलेल्या तक्रारींत नमूद केले आहे. २०१७ साली ज्यावेळेस अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी पाडण्या करिता शासकीय अधिकारी पोलीस बंदोबस्ता सह गेले असता त्या वेळस सुद्धा असेच चितावणीखोर व्यक्तव्य करुन सभासदांच्या नावा खाली इतर लोकांना बोलवून पोलीस ताफ्याला हुसकावून लावले होते. ह्यावेळी देखील त्याच घटनेची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोलापूर शहर पोलीस उपायुक्त यांना तक्रार देण्याप्रसंगी सोलापूर विकास मंचचे केतनभाई शहा, विजय कुंदन जाधव, योगीन गुर्जर, अॅड.खतिब वकील, अॅड प्रमोद शहा, मिलिंद भोसले, आनंद पाटील उपस्थित होते.