Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराजांशी रयतेच्या मनांत आत्मविश्वास निर्माण केला. स्वराज्य निर्मिती करून राज्य संभाळले असे मत प्रा. राजेंद्र दास यांनी केले.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शिवजयंती निमित्त प्रा. दास यांचे व्याखानाचे आयोजन करणेत आले होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात शिवरायांचे पुतळ्यास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करणेत आले.

या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, उपायुक्त पांडे, समाज कल्याण अधिकारी जाधव, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, शिक्षणाधिकारी संजय राठोड, विवेक लिंगराज, मगे साहेब उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बोलताना प्रा. राजेंद्र दास म्हणाले , छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वकियांसाठी लढा द्यावा लागले. महाराजांनी कोणतेही काम स्वत साठी केले नाही. औरंगजेबाचे दरबारात जाऊन आले. आग्रा किल्ला मधून हातोहात निघून आले. त्यानी विविध कल्पकता वापरली. बहिर्जी नाईक यांचे सारखे गुप्तहेर होते. जमिनीला कान लावून शत्रुचा अंदाज घेत. झाडावर झोपून पक्षांचे आवाज काढत शत्रुचा मागोवा घेत. महाराजांनी गनिमी काव्याचा वापर केला. स्वराज्य निकिमान करून सांभाळणे काय असते हे निर्माण करणारेस माहित असते. राजांनी ते केले. त्या काळात अनेक राजे होऊन गेले परंतू शिवरायांनी रयतेसाठी.. सर्वसामान्य गरीब शेतकरी यांचे साठी काम केले म्हणून त्यांना आदर आहे.
या प्रसंगी बोलताना सिईओ दिलीप स्वामी म्हणाले , सर्व धर्माच्या ग्रंथा मध्ये मानवता सांगितली आहे. वुचार एकच आहेच. शिवरायाचे विचार या निमित्ताने सर्वांना एकण्याचा योग आला आहे. जयंती च्या निमित्तीने विरपुरूषांचे तत्वज्ञान समजून घ्तल् पाहिजे.

या प्रसंगी जिल्हा परिषेदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांनी मार्गद्रशन करून जिल्हा परिषद राज्यात प्रथम क्रमांकावर नेणेसाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन करून शिवजयंती च्या शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले.

मराठा सेवा संघ अनिल जगताप, अविनाश गोडसे, सूर्यकांत मोहिते ,शाखाध्यक्ष अनिल पाटील, महेंद्र माने, चेतन भोसले, उमेश खंडागळे, रोहित घुले , वासू घाडगे चव्हाण, गणेश पाटील, मेहकर, विशाल घोगरे डॉ. माने , गिरीष जाधव, अरुण क्षीरसागर मोहित वाघमारे, भूषण काळे, जीवन भोसले शिवाजीराव भिंगारे यांनी कार्यक्रम यशस्वी करणेसाठी प्रयत्न केले. मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेचे वतीने या व्याखानाचे आयोजन करणेत आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *