सोलापूर : वळसंग पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून १० जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रकमेसह पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वळसंग पोलिसांनी गंगाप्रसाद पेट्रोलपंपाच्या पाठीमागील शेतातील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकला. या छाप्यात १० आरोपी हे पत्ते खेळताना मिळून आले. त्यांच्याकडून ८ मोबाइल, २ दुचाकी, १० हजार १०० रुपयांची रोकड असा एकूण पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
शंकर भोपळे, यल्लाप्पा जाधव ( दोघे रा. होटगी ), श्रीकांत करपे, उमर दारुवाले ( रा. सोलापूर ), रवींद्र बगले ( रा. खरादी नगर ), लतीफ पानगल ( रा. न्यू पाच्छा पेठ ), जयपाल जंगम ( रा. लष्कर ), सीताराम गुजले, चंद्रकांत फुलारी ( दोघे रा.अभिषेक नगर ), शहानवाज शहापुरे ( रा. मुमताज नगर ) यांच्याविरोधात वळसंग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई फौजदार अजय हंचाटे, पोलीस कर्मचारी माने, वाळुजकर, सूर्यवंशी यांनी केली.