Latest Post

Пин Ап Казино — Официальный сайт Pin Up Casino Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş

सोलापूर,जुळे सोलापूर शहर हद्द वाढ भागातील समस्येबाबत संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष शाम कदम यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांना शेळगी येथील मठात भेटून निवेदन देण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेड च्या शिष्टमंडळ यांच्याशी सोलापूरच्या विविध प्रश्नांवर सुमारे अर्धा तास चर्चा करण्यात आली.

आसरा चौकातून जुळे सोलापूर कडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेला रेल्वेचा पुल अरुंद होत आहे. वाढणारी रहदारी पाहता मोठ्या पुलाची नितांत गरज आहे. याबाबत खासदार डॉ. जय सिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी मध्य रेल्वे डीआरएम शैलेश गुप्ता यांच्याशी संपर्क केला. याबाबत लवकरच बैठक घेऊन नवीन पुलाच्या संदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश खा. डॉ. महास्वामी यांनी दिले.

यावेळी शहराध्यक्ष श्याम कदम यांनी जुळे सोलापूर ला ये जा करण्यासाठी आणखी एका पर्यायी रस्त्याची गरज असल्याचे खासदार यांना निदर्शनास आणून दिले. तसेच कल्याण नगर भाग 1,2 आणि 3 मधील नागरी समस्येबाबत मनपा आयुक्त व महापौर यांच्या उपस्थितीत बैठक घेऊ. त्या भागात प्रत्यक्ष पाहणी करून अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी सांगितले.

छत्रपती संभाजी राजे तलाव परिसरात सुशोभीकरणासाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध झाला आहे. लवकरच सुशोभीकरण होऊन हा भाग विकसित होणार आहे. आणखी काही अडचणी असल्यास याबाबत लवकरच स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल असेही आश्वासन दिले. फक्त संभाजी महाराज तलाव नव्हे तर संपूर्ण सोलापूर पर्यटन स्थळ व्हावे म्हणून मी प्रयत्न करीत आहे त्यासाठी लोकसभा अध्यक्ष यांनी मला बोलण्यासाठी साठ मिनिटाचा वेळ दिला आहे असेही आवर्जून खासदार डॉ. जयसिद्धेश्वर यांनी सांगितले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष सीताराम बाबर, आशुतोष माने, सनी पटू, अजित शेटे, संजय भोसले, अरविंद शेळके, सोमनाथ पात्रे, पिंटू कोरे, अनिल सावंत, दत्ता पवार, श्रीकांत सुरवसे, रमेश जाधव, संदीप नरवड़े, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *