Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना अंतर्गत सोलापूर जिल्यातील ४ शाळाची “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान: (व्हीएसटीएफ) मिशन १०० आदर्श शाळा उपक्रम” राबविण्यासाठी निवड करण्यात आली आहे.

ग्रामविकास विभागाच्या वतीने राज्यात “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान: (व्हीएसटीएफ) राबविण्यात येत आहे. यासाठी १०० आदर्श शाळाची निवड करण्यात येणार आहे. या अनुषंगाने मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिलीप स्वामी (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली व्हीएसटीएफ जिल्हा अभियान परिषद, आढावा आणि नियोजन बैठक पार पडली. सदर बैठकीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. चंचल पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री संजयकुमार राठोड आदीची उपस्थीती होती. यावेळी जिल्हा अभियान परिषदेद्वारे या अभियानासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी, हिरज, व बेलाटी येथील तर माढा तालुक्यातील भेंड जिल्हा परिषद शाळेची निवड करण्यात आली. या शाळांना भेटी देऊन, आराखडा तयार करण्याचे निर्देश यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, दिलीप स्वामी यांनी दिले. निवडण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये आनंददायी शिक्षण, परसबाग व पर्यावरण पूरक उपक्रमांवर भर, शौचालय,स्वच्छता, पिण्यायोग्य शुद्ध पाणी, गुणवत्तापूर्ण शिक्षण,अद्यावत सोयीसुविधा असे विविध उपक्रम राबवून शाळा आदर्शवत करण्यासाठी सर्वानी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री संजयकुमार राठोड यांनी सांगितले. बैठकीस इतर श्रीमती. गोदावरी राठोड, विस्तार अधिकारी (शिक्षण), व्हीएसटीएफ जिल्हा कार्यकारी नंदकिशोर शेळके, व्हीएसटीएफ अंतर्गत ग्रामपंचायत चे सर्व ग्रामसेवक, मुख्याध्यापक, तालुका समन्वयक संदीप बारखडे, आनंद पुजारी, इ. उपस्थित होते.

गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानाची उद्दिष्टे:

भौतिक व गुणवत्तापूर्ण शिक्षणासह शाळाची निर्मिती करणे.

 विद्यार्थांना शाळेमध्ये स्वतंत्र शौचालय, पिण्याचे शुद्ध पाणी, hand wash station, बसण्यासाठी बेंच उपलब्ध करून देणे. इत्यादी.

 विविध तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व भागधारकांची प्रशिक्षणातून क्षमता बांधणी करणे.
 गावामध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी लोक सहभागातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे.

पर्यावरणस्नेही शाळा व आरोग्य आणि पोषण शाळा उपक्रम राबवविणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *