मुंबई : ठाणे व पालघर जिल्ह्यातील अवैध वाळू उपश्याला त्वरित आळा घालून संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत श्री.सत्तार बोलत होते. बैठकीला दोन्ही जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन, तहसीलदार, खनिकर्म अधिकारी आणि कक्ष अधिकारी उपस्थित होते.
ठाणे व पालघर जिल्ह्यातील अवैध वाळू उपश्याला त्वरित आळा घालून महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही श्री. सत्तार यांनी दिले.