Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

तपासणीचा उच्चांक 4711 ; ग्रामीण आज नवे पॉझिटिव्ह 549 तर मृत्यू ..!!

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज शुक्रवारी दि.11 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 549 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
यामध्ये 363 पुरुष तर 186 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 282आहे. आज 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 4711 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 4162 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 16 हजार 75 इतकी झाली आहे. यामध्ये 9817 पुरुष तर 6258 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

तर आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 468 जणांचा मृत्यू झाला आहे यात 323 पुरुष तर 145 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 5 हजार 110 आहे .यामध्ये 3 हजार 221 पुरुष तर 1889 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 10 हजार 497 यामध्ये 6273 पुरुष तर 4224 महिलांचा समावेश होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *