Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

 

हिंदुह्दयसम्राट स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सोलापूर शहर व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रेरणेने प्रबोधनात्मक ऑनलाईन मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार दि. 22 जानेवारी रोजी तरूणांच्या वाढत्या आत्महत्या या विषयावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ञ डॉ. कुंदन कांबळे यांनी सहभाग घेवून सखोल मार्गदर्शन केले.

गेल्या काही दिवसामध्ये राज्यातील तसेच सोलापूरमधील तरूणांच्या आत्महत्येमध्ये वाढ होत आहे. कोरोनाची महामारी सुरू असतानाच मानसिक नैराश्य अनेकांना येत आहे त्यातच खाजगी सावकारीचा पाश आवळला जात आहे, वाढत असलेली बेरोजगारी, व्यसनाधीनता यामुळे मनातून अनेकजण खचत चालला आहे त्यावर उपाय म्हणून आत्महत्येचा मार्ग निवडला जातो परंतु हे चुकीचे आहे. मनातून खचून न जाता खंबीरपणे आलेल्या अडचणीला सामोरे गेले पाहिजे. आपल्या आत्महत्येमुळे आपल्या परिवारातील लोकांवर, नातेवाईकांवर आणि परिसरातील लोकांवर काय परिणाम होतो याचाही विचार केला पाहिजे. आपल्यावर आलेल्या प्रत्येक प्रसंगाबाबत अडचणीबाबत आपल्या जवळच्या माणसासी बोलले पाहिजे मन रितं केले पाहिजे घरातील वातावरण हलकं फुलकं ठेवलं पाहिजे तरच चांगले विचार निर्माण होऊ शकतात घरातील प्रत्येकाने आपल्या जवळच्याशी बोलत राहिले पाहिजे असे डॉ. कुंदन कांबळे यांनी सांगितले. तरूणांच्यामध्ये नैराश्य येत असताना आत्महत्येचा विचार येतो आणि अघटीत घडते हे रोखण्यासाठी शासनस्तरावर कडक उपाय केले पाहिजे तसेच घरातील मोठ्या व्यक्ती असतील परिसरातील जुने ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांनीही आपल्या संपर्कात येणाऱ्या तरूणांशी चांगला सुसंवाद ठेवला पाहिजे तरच समाज सशक्त आणि सक्षम होणार आहे असेही डॉ. कांबळे यांनी सांगितले.

प्रारंभी स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यानंतर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सोलापूर शहराचे प्रमुख रविकांत गायकवाड यांनी या कार्यक्रमाचा उद्देश आपल्या प्रास्ताविकातून सांगितला त्यानंतर डॉ. कुंदन कांबळे यांचे स्वागत आणि सत्कार रविकांत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाची प्रेरणा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी दिली तर मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेना जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम बरडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाचा अनेकांनी लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *