Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

 

मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळण्याचेही केले आवाहन

मुंबई दि ११ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी जेजे रुग्णालय येथे जाऊन कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लस घेतली. याचवेळी रश्मी ठाकरे, श्रीमती मीनाताई पाटणकर तसेच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी देखील लस घेतली. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे, डॉ तात्याराव लहाने , आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, टास्क फोर्सचे डॉ शशांक जोशी उपस्थित होते

यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, लस घेण्यात कोणतीही भीती नाही. कोरोनावरील धोका वाढतो आहे. कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस आल्यामुळे या रोगापासून आपणास संरक्षण मिळणार आहे. या लसीचे काही दुष्परिणाम नसून जे पात्र आहेत त्या प्रत्येकाने ती घ्यावी. लस उपलब्ध असली तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, हात धूत राहणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे हे तितकेच महत्वाचे आहे. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही.


काही दिवसांपासून संसर्गात मोठी वाढ होत असून परिस्थिती सुधारली नाही तर आवश्यकतेनुसार काही ठिकाणी नाईलाजाने कडक लॉकडाऊन लावावा लागेल असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *