हिंदू देवी देवतांचे विटंबना करून सनातन हिंन्दू धर्म संस्क्रूतीच्या विरोधी क्रुत्या करणार्या तांडव वेब सीरीजमधल्या सैफ अली खान व त्याच्या सोबतील इतर सहकलाकाराच्यां विरोधात सोलापूरात अक्कलकोट रोड मल्लीकार्जून नगर रिक्षा स्टाफ येथे निदर्शने करण्यात आली. हिंदू-रक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अप्पू कडगंची यांच्या नेत्रूत्वखाली निषेधार्थ मोर्चा काढून तांडव वेब सीरीजचे पोस्टर जाळण्यात आले.
हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणावरून ‘तांडव’ वेबसीरिजविरोधात आज सोलापूर शहरात हिंदू संघटनांच्या वतीने तांडव वेब सिरीजचे व अभिनेता सैफ अली खानचे पोस्टर जाळून निषेध करण्यात आला.सैफ अली खान मुर्दाबाद अशा घोषणा देखील देण्यात आल्या.
अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रसारीत झालेल्या ‘तांडव’ वेबसीरिजविरोधात देशभरात सध्या रणकंदन सुरू झाले आहे. वेबसीरिजमध्ये हिंदू देवतांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप करत वेब सीरिजच्या निर्माते, कलाकारांविरोधात देशभरात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत तक्रार दाखल झाल्या आहेत. यानंतर या राज्यांतील पोलीस आता ‘तांडव’चे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांची चौकशी करणार आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश आणि मुंबईतही तांडव विरोधात तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे चार राज्यांचे पोलीस ‘तांडव’च्या मागे असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.वेब सीरिजमध्ये हिंदूंविरोधी चूकीच्या शब्दांचा वापर केल्याचे यात म्हटले आहे.