Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

‘दक्षिण’चा आगामी आमदार शिवसेनेचाच : पुरुषोत्तम बरडे

सोलापूर – दक्षिण सोलापूर मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद असून आगामी निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून शिवसेनेचाच आमदार निवडून येईल असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी व्यक्त केला. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी सकाळी जुनी मिल कंपाऊंड येथील शिवसेना कार्यालयात आयोजित करण्यात आली होती, त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन बरडे बोलत होते. बैठकी प्रसंगी शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर, नुतन उपजिल्हाप्रमुख अमर पाटील, भीमाशंकर म्हेत्रे, तालुकाप्रमुख योगीराज पाटील, तालुका संघटक गंगाराम चौगुले, माजी तालुकाप्रमुख रमेश नवले, बापू कोकरे, माजी नगरसेवक शैलेश अमणगी व महिला आघाडी तालुकाप्रमुख लता राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक भीमाशंकर म्हेत्रे यांनी केले.

जुन्या-नव्या पदाधिकाऱ्यांची सांगड घालत पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी विधानसभा मतदारसंघ निहाय बैठका घेण्यात येणार असून कोवीडच्या पार्श्वभूमीवर स्थगित केलेल्या बैठका आता घेतल्या जाणार आहेत.
याप्रसंगी बोलताना पुरुषोत्तम बरडे म्हणाले की, नागरिकांच्या अडीअडचणीला सर्वात प्रथम धावून जातो तोच खरा शिवसैनिक आहे.अशा शिवसैनिकांची ताकद या दक्षिण सोलापूर मतदारसंघात चांगली असून यापूर्वी शिवसेनेच्या चिन्हावर या भागातून आमदार निवडून आलेला आहे. आत्ता पुन्हा एकदा सर्वांनी नव्या जोमाने कामाला लागावे आणि जनतेच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवून शिवसेनेचा विचार तळागाळात पोहचवावा. विद्यमान आमदाराविषयी जनतेच्या मनात प्रचंड रोष असून जनता या लोकांना वैतागली आहे. मुख्यमंत्री आपल्या पक्षाचे असून सत्तेचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे.


शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर म्हणाले की ‘जुने ते सोने’ हे खरे असले, तरी ‘नवे ते हवे’ हे ही तितकेच खरे आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करुन नवयुवकांना पक्षाशी जोडण्यासाठी सहाय्य करावे. निवडणुका येतील-जातील पण, ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या शिवसेनाप्रमुखांनी सांगितलेल्या ब्रीदवाक्याप्रमाणे सदैव कार्यरत रहावे म्हणजे आपोआप पक्ष मजबूत होईल व आगामी काळात भगवा फडकेल.
अमर रतिकांत पाटील यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीसह विधानसभेसाठी पक्ष संघटनेची मजबूत बांधणी करण्याचा शब्द दिला.

शिवसेना बैठक

याशिवाय तालुकाप्रमुख योगिराज पाटील, रमेश नवले व गंगाराम चौगुले यांनीही मनोगत व्यक्त केले. या बैठकीचे सूत्रसंचालन निरंजन बोध्दूल यांनी केले. या कार्यक्रमास आप्पासाहेब व्हनमाने, भागवत जोगधनकर, रेवन बक्कापुरे, विकास म्हेत्रे,सुनील कुंभार,विजय वाले ,विश्वनाथ अलकुंटे, प्रदीप भोसले, रोहित तडवळकर, सागर कोकरे, शिवशंकर बिराजदार ,दत्तात्रय माने, प्रवीण बगले, मल्लिकार्जुन शिरडोनकर, विशाल पतंगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *