Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज २५ डिसेंबरला पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman nidhi) अंतर्गत आर्थिक लाभाचा पुढील हप्ता जाहीर केलाय. पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ( Video Conferencing ) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याअंतर्गत ९ कोटीहून अधिक शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात १८,००० कोटीहून अधिक रक्कम हस्तांतरित केली आहे.

९ कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना लाभ
तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी गुरुवारी ट्विट (Tweet) केले आणि म्हणाले, देशातील अन्न पुरवठा करणाऱ्यांसाठी शुक्रवारचा दिवस महत्वाचा आहे. दुपारी १२ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ९ कोटींपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांना पंतप्रधान-किसानचा पुढील हप्ता जाहीर करण्याचा बहुमान मिळणार आहे. या निमित्ताने अनेक राज्यातील शेतकरी भावंडांशी मी संवाद साधेन.

यापूर्वी पीएमओने जारी केलेल्या निवेदनात या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान सहा राज्यांतील शेतकऱ्यांशी संवादही साधतील. त्यानुसार, ‘पंतप्रधान पीएम किसान आणि केंद्र सरकारच्या इतर कृषी कल्याणकारी योजनांविषयीचे आपले अनुभव पंतप्रधानांना सांगतील. या योजनेंतर्गत दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये ६००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविले जातील.

ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये पाठविली जाणार
तीन हप्त्यात २००० रुपये रक्कम पाठविली जाणार आहे. हा कार्यक्रम अशा वेळी होत आहे जेव्हा शेतकरी गेल्या काही आठवड्यांपासून दिल्लीच्या विविध सीमांवर तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आहेत. हे तीन कायदे शेतकर्‍यांच्या हिताचे आहेत, असा सरकारचा दावा आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *