Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी कोरोनाचे 55  रुग्ण आढळले असून यामध्ये 38  पुरुष तर 17  स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 70  इतकी आहे. यामध्ये 15 पुरुष तर 55  महिलांचा समावेश होतो

सोमवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 365  जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 310 जणांचे निगेटीव्ह तर 55 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज कोणाचाही कोरोनाने मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 6 हजार 643 असून एकूण मृतांची संख्या 412 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 782 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 5 हजार 449 इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *