Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

सोलापूर : दिवाळी म्हणजे दिव्यांचा लखलखाट, प्रकाशाचा झगमगाट. घराच्या दारापाशी, तुळशीजवळ लावण्यात येणा-या दिव्यांमुळे शहरात मंगलमय वातावरणाची प्रचिती येते. दिवाळीशी अतूट नाते असणारे हे दिवे बाजारात दाखल झाले आहेत. छोटय़ाशा, नाजूक, रंगीबेरंगी पणत्यांमुळे दिपोत्सव पूर्ण होऊच शकत नाही. दसरा झाल्यानंतर  दुकानात विक्रीसाठी दाखल झालेले दिवे नजरेस पडत आहेत. दिवाळीच्या निमित्तानं बाजारात विविध डिझाईन, रंगसंगती, आकार, यांसह वेगवेगळ्या प्रकारच्या पणत्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहे.

लाल मातीने बनवलेल्या छोटय़ा पारंपरिक पणत्यांपासून हल्ली ट्रेन्डमध्ये असलेल्या निऑन रंगातील दिव्यांनाही मागणी आहे. चकाकणारी चमकी, टिकल्या, घुंगरू, काच आदी सजावटींच्या वस्तू वापरत बनवलेल्या ट्रेन्डी, डिझायनर पणत्या बाजारात दिसत आहेत. विशेष म्हणजे यंदा राजस्थानी कुंदन वर्क केलेल्या पणत्या देखील बाजारात पाहायला मिळत आहेत. तसेच रिफ्लेक्शन दिव्याच्या पणत्या यावेळी आकर्षणाचा विषय ठरत आहे.

नवीपेठ मधील सीजन मॉलचे विक्रेते संतोष पाठक सांगतात,
“ग्राहकांना खरेदीची सोय व्हावी यासाठी विक्रेत्यांनी आपल्या स्टॉलमध्ये सर्व प्रकारच्या वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये दिवाळीचे परिपूर्ण पूजा साहित्य किट, विविध प्रकारचे आकर्षक दिवे तसेच गृह सजावटीचे सामान, आकर्षक रोषणाई असलेले अनेक प्रकारचे दिवे, किल्ले, घरकुल, गिफ्ट आर्टिकल्स, लहान मुलांसाठी गिफ्ट,  कॉर्पोरेट गिफ्ट, कमर्शियल गिफ्ट, ड्रायफ्रुट्स, चॉकलेट्स अश्या असंख्य व्हराईटी असलेल्या सर्व वस्तू आपल्याला एकाच छताखाली उपलब्ध आहेत.”

दिवाळीत भरघोस मागणी असलेल्या या पणत्यांचे रुपडे गेल्या काही वर्षात बदलत चालले आहे. पण पारंपरिक पणत्यांची आवड तीळमात्रही कमी झालेली नाही. पारंपरिक पणत्या लाल मातीपासून तयार केल्या जातात. चिनी माती, प्लास्टर ऑफ पॅरिस यांचा वापर करत बनवलेल्या पणत्याही बाजारात दाखल झाल्या आहेत. चौकोनी, गोलागार, षटकोनी, पान, बदाम, फुलं, कमळ, तुळशी वृंदावन अशा विविध आकारांतील आकर्षक पणत्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहेत.

पणत्यांच्या किंमती सर्वसामान्यांच्या किमतीतप

मातीच्या पणत्यांमधून तेल गळते. त्यामुळे रांगोळीच्या जवळपास, जमिनीवर तेलाचे डाग पडतात. या कारणाने प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या पण त्यांना अनेक जण पसंती देत असल्याचे दिवे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. बाजारात 10 रुपयांपासून ते 250-300 रुपयांपर्यंत आणि त्याहून महाग दिवे आहेत. लाल मातीचे साधे, छोटे दिवे आधी 5 रुपयांपर्यंत मिळायचे. आता एका दिव्याची किंमत 10 रु. झाली आहे. रंगरंगोटी केलेले; पण साधे दिवे प्रति 20 रु. आहेत. काच, चकमकी, मणी आदी सजावटीचे साहित्य वापरत बनवलेल्या दिव्यांची किंमत 50 रुपयांपासून सुरू होत 100 रुपयांपर्यंत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *