Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

सोलापूर – उस्मानाबाद मार्गावर टेम्पोला अपघात

भल्या पहाटे कांदा विक्री करून पोटाची खळगी भागवणाऱ्या शेतकऱ्यांवर काळाचा घाला पडला आहे . ही दुर्दैवी घटना बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. सविस्तर माहिती अशी की…
कांदा घेऊन सोलापूरकडे निघालेल्या आयशर टेम्पोला झालेल्या अपघातात 3 जण ठार तर 1 जण जखमी झाला आहे. आराधवाडी ( ता.तुळजापूर, जि. उस्मानाबाद ) येथे हा अपघात बुधवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

नेकनूर ( ता.केज, जि. बीड ) येथील शेतकरी आयशर टेम्पो ( क्र. एम. एच.16, ए. इ. 7704 ) मधून विक्रीसाठी कांदा घेऊन सोलापूरकडे निघाले होते. तुळजापूर जवळ आल्यानंतर आराधवाडी भागात बायपास पुलावर चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि हा अपघात घडला.

या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण रुग्णालयात घेऊन जात असताना मयत झाला आहे. मोहन भागवत मुंढे ( वय 50 वर्षे ) देवराम धोंडीराम शिंदे ( वय 50 वर्षे ) सज्जत शकलम शेख ( वय 30 वर्षे ) अशी मयतांची नावे आहेत. तर भागवत शिवाजी मुंढे असे जखमींचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी उस्मानाबाद येथे हलवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *