Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कोरोना विषाणूची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यासाठी सज्ज रहा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिल्या.

उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्ह्यातील पूर स्थिती आणि कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाय योजनांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

शासकीय विश्रामगृह येथे ही बैठक झाली.  बैठकीस पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, आमदार संजय शिंदे, आमदार यशवंत माने, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, सोलापूर महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी अधिकारी उपस्थित होते

उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले की, सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. मात्र केंद्रीय संस्थांकडून नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे आपण काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरु केली आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात यावी.

कोरोना अद्यापही संपलेला नाही ही बाब लक्षात ठेवून शहर आणि जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल सज्ज ठेवावेत. बेडची संख्या, ऑक्सिजन उपलब्धता, डॉक्टर संख्या, इतर कर्मचारी यांच्या रिक्त जागा स्थानिकरित्या भरती कराव्यात. अशा सूचना त्यांनी केल्या.

बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, अधीक्षक अभियंता संतोष शेलार, हेमंत निकम,दीपक शिंदे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार यांनी दिलेल्या सूचना :-

  • माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत लोकसहभाग वाढवा.
  • नॉन कोविड हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार मिळतील याकडे लक्ष द्या.
  • कोविड उपचाराची बिले तपासा जिल्हा परिषदेच्या निधीतून रुग्ण वाहिकांची खरेदी करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *