Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

सोलापूर,दि.22 : मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली होती. मात्र या बैठकीला सभेचे स्वरूप प्राप्त झाले. यामुळे 50 हून अधिक लोकांची गर्दी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भाने
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे 21 मार्च रोजी सकाळी 9 ते 12.30 या कालावधीत श्रीयश पॅलेस येथे आढावा बैठक झाली. त्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी संदीप औदुंबर मांडवे (रा. लक्ष्मी टाकळी, ता. पंढरपूर) यांनी 20 मार्च रोजी परवानगी घेतली होती. त्यानुसार त्यांना कोविडच्या नियम व अटी व शर्तीचा परवानगी मिळाली होती. मात्र  फक्त 50 लोक हे या बैठकीला उपस्थित राहतील अशी लेखी सूचना देऊन परवानगी देण्यात आली होती.

मात्र या बैठकीस 50 हून अधिक लोक जमले. यामुळे पंचायत समितीचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी नेमलेल्या छायाचित्रीकरण पथक प्रमुख मेघराज काशिनाथ कोरे (वय 54) यांनी  संदीप औदुंबर मांडवे यांच्याविरुद्ध कलम 188 भादवि अन्वये तक्रार दिली असल्याची माहिती उप विभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *