पंधरा वर्षे जुन्या वाहनांची पुनर्नोंदणी करा ; अन्यथा …

पंधरा वर्षे जुन्या दुचाकी, चारचाकी वाहनांचा पर्यावरण कर भरुन वाहनांची पुनर्नोंदणी करुन घेण्याचे आवाहन अकलूजचे  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.

            सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पंधरा वर्षे जुनी वाहने रस्त्यावर आढळल्यास नोंदणी रद्द करण्याचे आदेश आहेत.  अकलूज कार्यक्षेत्रातील वाहनधारकांनी पर्यावरण कर भरुन वाहनांची पुनर्नोंदणी (आरआरसी) करुन घ्यावी. पंधरा वर्षे जुनी वाहने रस्त्यावर आढळल्यास पथकाद्वारे कडक कारवाई करण्यात येईल, असे श्रीमती गायकवाड यांनी कळविले आहे.