Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

▪️सोलापूर वन विभाग व नान्नज वन्यजीव अभयारण्य सोलापूर आणि वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन फाउंडेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पक्षी सप्ताहानिमित्त कुरनुर धरण, चपळगाव, ता. अक्कलकोट परिसरात पक्षी निरीक्षणाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

▪️सकाळी ठीक 6 वाजता सोलापूरहुन पक्षीप्रेमींचा जथ्था कुरनूर धरणाकडे रवाना झाला. 7 वा. धरणाच्या परिसरात पोहोचल्यानंतर सुरुवातीला चप्‍पळगावचे पोलीस पाटील विजय बावकर व महाराज शिवाजी जाधव यांच्या हस्ते या पक्षीनिरीक्षणाचा उपक्रमाचे औपचारिकरित्या उदघाटन करण्यात आले. यावेळी WCF’S तर्फे प्रमुख पाहुण्यांना स्मृतिचिन्ह रूपात पक्षांचे फोटो फ्रेम भेट देण्यात आले.

▪️ यानंतर प्रत्येकी दहा पक्षीप्रेमीचा एक – एक गट तयार करून विविध दिशांमध्ये त्यांना पक्षीनिरीक्षणासाठी पाठवण्यात आले. या प्रत्येक गटांमध्ये दोन ते तीन पक्षीतज्ञांचा समावेश करण्यात आला होता. पक्षीप्रेमींच्या अनेक प्रश्नांना यावेळी पक्षीतज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली. आणि यासोबतच त्यांनी या भागांमध्ये आढळणाऱ्या विविध पक्ष्यांच्या जाती, त्यांची आश्रयस्थळे, त्यांचा नैसर्गिक अधिवास इत्यादीद्वारे पक्ष्यांची ओळख सुद्धा करून दिली. यावेळी बच्चे कंपनीने सुद्धा उत्साहामध्ये आपला सहभाग नोंदवला.

▪️ दुपारी 12 च्या दरम्यान हा पक्षीप्रेमीचा जथ्था वा. धरण परिसरात पोहोचला तिथे कुरनूर धरणाची पाहणी करण्यात आली. धरण पाहताना अनेकांनी मनमुरादपणे सेल्फी फोटोग्राफीचा मनसोक्त आनंद लुटला.

▪️या पक्षीनिरीक्षणावेळी एकूण 58 पक्ष्याचे नोंदी करण्यात आले. यामध्ये कुरनुर धरण परिसरात पहिल्यांदाच रत्नाकर हिरेमठ, ऋतुराज कुंभार विनय गोटे, अजय हिरेमठ यांना लालटोपी सातभाई या पक्ष्याचे दर्शन झाले. पहिल्यांदाच या लालटोपी सातभाई पक्ष्याची नोंद कुरनुर धरण परिसरात करण्यात आली. जवळपास 8 पक्ष्याचा थवा पक्षी प्रेमीना पाहायला मिळाला. सोलापूरच्या पक्षीप्रेमीसाठी जणू ही एक मेजवानीच होती. रंगीत मैना, कवडी मैना, चातक, गुलाबी मैना, हळद्या, वटवट्या, बुलबुल, चित्रबलाक, करड्या डोक्याची मैना, तांबट, पिंगळा, तुतारी, राखी धनेश, काळ्या डोक्याची मनोली, लाल मुनिया, मोठा पाणकावळा असे अनेक विविध पक्ष्याचे दर्शन पक्षी प्रेमींना झाले.
या उपक्रमास एकूण 60 पक्षीप्रेमींनी सहभाग नोंदवला होता. हजर असणाऱ्या अनेक पक्षीप्रेमींनी या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. तसेच येत्या हिवाळा ऋतूमध्ये सुद्धा इतर ठिकाणी असा उपक्रम आयोजित करावा अशी सदिच्छा पक्षीप्रेमींनी व्यक्त केली.

▪️यावेळी WCF’ S चे समन्वयक शिवानंद हिरेमठ, अजित चौहान, सुरेश क्षीरसागर, ओंकार बुरळे, सचिन पाटील, नीलकंठ पाटील, आदित्य क्षीरसागर, बापू मोरे, सारंग म्हमाणे, पंकज चिंदरकर, शोभा शेटे, मोनिका माने, शिवानी गोटे, ऋतुराज कुंभार, महादेव डोंगरे वन्यजीव प्रेमीचे मुकुंद शेटे तसेच राहत एनिमलचे डॉ. राकेश चितोड व पक्षीप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला.कुरनुर धरण येथे पक्षीनिरीक्षनात पहिल्यांदा दिसला लालटोपी सातभाई पक्षी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *