Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

पाळीव प्राणी दुकान  व श्वान प्रजनन  व विपणन केंद्रांची *नोंदणी महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे करणे बंधनकारक आहे.* त्याप्रमाणे सर्व संबधित स्थानिक प्रशासनाने त्याच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्यांनी ही नोंद करावी, *अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिला.*   जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीची बैठक जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली  झाली, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीत शासनाकडून आलेल्या फंडामधून भटक्या जनावरांकरिता अनिमल शेल्टरला मदत करणे, शेल्टर होम सुरु करणे, तसेच त्याअनुषंगिक उपयुक्त गोष्टींना आर्थिक मदत करणे,  शहरात उघड्यावर बोकड/कोंबड्यांची होणारी कत्तल व शहरातील मांस विक्री दुकानांची स्वच्छता ब आरोग्य संबधिबाबी याबाबत  सदस्यांनी मुद्दा उपस्थिती केला त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी अन्न ब प्रशासन विभागास योग्य त्या सूचना देत नियमांचे उल्लघंन करून  जनावरांची वाहतूक होत असले तर त्यांचा गाडी परवाना रद्द करण्याबाबत कारवाई करण्याचे सूचित केले.   महानगरपालिका कार्यक्षेत्रातील भटक्या श्‍वानांची संख्या वाढली आहे. त्यामुळे लोकांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. त्यावर उपाययोजना म्हणून श्‍वान निब्रीजीकरण कार्यक्रम चालू करण्याच्या सूचना दिल्या.  उपायुक्तांनी निविदा प्रक्रिया चालू असून लवकरच श्‍वान निब्रीजीकरण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.  काही सदस्यांनी बार्शी येथे खुलेआम गोवंश हत्या बंदी कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर जिल्हाधिकार्‍यांनी पोलीस विभागाने जनावरांचे अवैध वाहतुक व अवैध कत्तलखाने याबाबत कारवाई करून पुढील बैठकीत केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्यास सूचित केले.

या बैठकीस **डॉ. सोनवणे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त* तथा सचिव जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी , *पोलीस सहाय्यक आयुक्त सोनलकर व सहाय्यक आयुक्त अभय डोंगरे, मनपा उपायुक्त धनराज पांडे,प्राणी संग्रहालयचे डॉ. नितीन गोटे , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जाधव ,पोलीस उपनिरीक्षक ग्रामीण पाटील, अशासकीय सदस्य विजयकुमार हत्तुरे, केतन शहा, महेश भंडारी, दिलीप गडदे, पांडुरंग कुलकर्णी, यशवंत सुर्वे, पशुसंवर्धन विभागाचे अंबाळकर, पेटशॉप चे आशिष म्हेत्रे, विनोद तुम्मा, प्रणय जमादार* आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *