राज्यातील मंदिराच्या मुद्द्यावरून मनसे अधिक आक्रमक भूमिका घेतना दिसत आहे. पुनःश्च हरी ॐ म्हणता व ‘हरी’ला चं कोंडून ठेवता, अशी खोचक टीका मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारवर केली आहे.
बाळा नांदगावकर यांनी ट्विट करून राज्य सरकारवर मंदिराच्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडलं आहे. पुनःश्च हरी ॐ म्हणता व “हरी” ला च कोंडून ठेवता. बार उघडले, मग बार ची वेळ देखील वाढवून दिली. आता जलतरण तलाव , मल्टिप्लेक्स ला परवानगी, मग कोरोना फक्त मंदिरातच होईल का? काय तर्क (Logic) असावा या मागे हे कोडेच आहे. हा केवळ भावनेचा नाही तर मंदिरावर अवलंबून असणाऱ्या हजारो व्यावसायिकांच्या रोजीरोटीचाही प्रश्न आहे, असं नांदगावकरांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारने गुटखा निर्मिती आणि विक्रीवर संपूर्ण देशात बंदी आणावी, अशी मागणी करतानाच महाराष्ट्र सारख्या राज्यात गुटखा विक्रीवर बंदी आहेच. परंतु तरीही राज्यात चोरट्या मार्गाने दुसऱ्या राज्यातून अनेक मार्गांनी गुटखा येत असून त्याला पायबंद घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. गुटखा सेवन करून काही लोक सार्वजनिक ठिकाणी थुंकत असतात इतरांच्या आरोग्यासाठी हे घातक असल्यानेच देशभरातही गुटखा विक्रीवर बंदी आणा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.