सोलापूर दिनांक बँक ऑफ महाराष्ट्र कृषी विषयक थकित कर्जदारांसाठी विशेष तडजोड योजना जाहीर केली आहे .यात दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज येणे बाकी असलेल्या कर्जदारांच्या सर्व संचित व्याज माफ करण्यात येणार आहेच, याशिवाय मुद्दल मध्ये ही काही प्रमाणात सूट मिळेल अशी माहिती महाराष्ट्र बँकेचे सोलापूर झोनल चे मॅनेजर हेमंत महाजन यांनी दिली.
गेल्या काही वर्षापासून कृषी क्षेत्रावर येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकरी यातून कर्ज मुक्त व्हावा त्याला पुन्हा उभारता यावं यासाठी ही योजना आणली आहे. विशेष म्हणजे या योजनेत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा महाराष्ट्र बँक कर्ज ही देणार आहे. या विशेष ओटीएस योजनेअंतर्गत बँकेच्या 11 हजार 200 वर खातेदारांना लाभ मिळू शकतो. बँकेची सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील कृषी विषयक थकबाकी 256 कोटी रुपये इतकी आहे .ज्या शेतकऱ्यांनी कृषी विषयक खर्चाबरोबरच गृहकर्ज वाहन कर्ज घेतली आहेत त्यावर देखील बँकेच्या नियमानुसार सूट दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलं .पत्रकार परिषदेस बँकेचे कृषिविषयक अधिकारी अमरेंद्र कांत, श्रीशैल मेहरकर, प्रसाद आतनूर कर आदी उपस्थित होते.
Leave a Reply