देशभरातील राष्ट्रीयीकृत बँकातील सर्वच संघटनांनी एकत्र येऊन युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सची स्थापना केली. केंद्रिय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना निवेदन केले की, या वर्षी किमान दोन राष्ट्रीयीकृत बँकांचे खाजगीकरण करण्यात येईल. त्यावर लगेच बँक कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन विचार विनिमय करून त्यास विरोध करण्याचा निर्णय घेतला. सरकारशी चर्चाही केली. सरकारने त्या बँकांची नावेही सांगितली नाहीत किंवा खाजगीकरण रद्द करू असे आश्वासनही दिले नाही यामुळे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने रीतसर कामगार कायद्यानुसार दिनांक 15 आणि 16 मार्च 2021 रोजी देशव्यापी संपाची हाक दिली होती.
खाजगीकरणाच्या विरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन संघटनेच्या वतीने सर्व बँकेसमोर निषेध, काही ठिकाणी नागरिकांमध्ये जनजागृती
बँकेच्या खाजगीकरण विरोधात दोन दिवसांच्या संपाची हाक दिली होती. शहर जिल्ह्यातील तीनशेहून अधिक राष्ट्रीयकृत बँकांनी संपात सहभाग नोंदवला असून दुसऱ्यादिवशी संपास चांगला प्रतिसाद मिळाला. विविध बँकांच्या समोर युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन संघटनेच्या वतीने विविध बॅनर लावून निषेध व्यक्त करण्यात आला. दोन दिवसात दिवशी 5 हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान कोणताही तोडगा निघालेला नाही मात्र उद्या बुधवारपासून शहर जिल्ह्यातील बँका सुरळीत सुरू होणार असल्याचे बॅंक अधिकारी अतनूरकर यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये दोन बँकांचे खाजगीकरण करण्याचे संकेत दिले यामध्ये बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या लीड बँकेचा समावेशचे भविष्यात खाजगीकरण करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केल्यानंतर केंद्र सरकारच्या या जाचक निर्णयाविरुद्ध युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्यावतीने निषेध नोंदवण्यात आला. त्याच अनुषंगाने आज सोमवार दिनांक 15 मार्च आणि मंगळवार दिनांक 16 मार्च रोजी बँका या कडकडीत बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले त्यानुसार 15 मार्च रोजी सोमवारी रेल्वे लाईन्स इथल्या बँक ऑफ इंडिया शाखेसमोर बँक कर्मचारी संघटनांनी या निर्णयाविरुद्ध निषेध नोंदवला. विविध फलक हाती घेऊन केंद्र सरकारच्या या जाचक निर्णयाविरुद्ध आवाज उठवला. दुसऱ्या दिवशी काही ठिकाणी निदर्शने तर काही ठिकाणे खाजगीकरणाच्या विषयी नागरिकांच्या बँक कर्मचाऱ्यांनी मुलाखती घेतल्या.
दोन्ही दिवशी चांगला प्रतिसाद…
खासगीकरणाच्या विरोधात दोन दिवसीय संपात सर्वच बँकांनी चांगला सहभाग नोंदवला. उद्या बुधवारपासून शहर जिल्ह्यातील बँका सुरळीतपणे सुरू होणार आहे. खासगीकरणावर जोपर्यंत तोडगा निघणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही.
अजय बागेवाडी, निमंत्रक
- स्टेट बँक ऑफ इंडिया
तर बेमुदत संपावर जाऊ
बँकाच्या खाजगीकरण या विरोधात देशभरातील सर्व बँकांनी संपाची हाक दिली होती. सोलापूर शहर जिल्ह्यातील तीनशे राष्ट्रीयकृत बँक आणि तब्बल तीन हजार कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. दोन्ही दिवशी संपास चांगला प्रतिसाद मिळाला. यावर अद्यापि तोडगा निघालेला नाही. तोडगा न निघाल्यास बेमुदत संपावर जाऊ. लवकरच आंदोलनाची पुढील दिशा ठरेल
प्रसाद आतनूरकर,
बँक ऑफ महाराष्ट्र